तीन सख्ख्या बहिणींच्या प्रेमात पडला तरूण, एकाच मांडवात बांधली तिघींशी लग्नगाठ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

असं म्हणतात की दोन जिवांच्या लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात. पण या नियमाला अपवाद असणारं एक लग्न पार पडलं आहे. या लग्नात तीन सख्ख्या बहिणी वधू असून त्या तिघींसोबत एका तरुणाने लग्नगाठ बांधली आहे.

ही घटना आफ्रिकेतील कांगो या देशात घडली आहे. या बहिणींची नावं नताशा, नताली आणि नादेगे असं आहे. तर या तिघींशी लग्न करणाऱ्या तरुणाचं नाव लुविझो असं आहे, त्याचं वय 32 वर्षं इतकं आहे. तो सर्वात आधी नताशाला सोशल मीडियावर भेटला होता. त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध जुळले.

नताशानंतर तो नादेगे आणि नतालीला भेटला आणि तो त्यांच्याही प्रेमात पडला. तसंच, त्या तिघींनाही तो खूप आवडला. त्यामुळे तिघींनीही त्याला लग्नाची मागणी घातली. त्याला ही मागणी कळल्यावर धक्काच बसला. पण, त्याने लग्नाला होकार दिला.

या तिघींशी त्याने एकाच मांडवात लग्न केलं. अर्थात या लग्नामुळे त्यांचे पालक खुश नव्हते. त्यांनी त्यांची नाराजी व्यक्तही केली. त्यामुळे ते लग्नालाही हजर राहिले नाहीत. पण, त्याने विशेष काही फरक पडत नाही कारण आपण या लग्नाने खुश आहोत, असं लुविझोचं म्हणणं आहे.

तिघींनी एकच नवरा करण्यामागचं कारणही नताशा, नताली आणि नादेगे यांनी आपल्याला लहानपणापासून एखादी गोष्ट शेअर करण्याची सवय असल्याने नवराही शेअर करण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं आहे.