रत्नागिरीत तिघांवर चॉपरने वार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

शिमगा साजरा करत असताना बुधवारी साडे दहा वाजता ढोलताशे वाजवले जात होते. हे ढोलताशे वाजवणे बंद करा, असे सांगितल्यानंतर रात्री पुन्हा अडीच वाजता होळी पेटविण्यासाठी गवत आणायला गेलेल्या एकावर चॉपरने वार झाला. सोडविण्यासाठी गेलेल्या अन्य दोघांवरही चॉपरने वार करण्यात आला. ही घटना रत्नागिरीतील पोलीस लाईन येथे घडली.

महेश मिलके याने रात्री साडे दहा वाजता ढोलताशे वाजवणे बंद करा असे सांगितले. त्यानंतर रात्री अडीच वाजता महेश मिलके याने प्रशांत मोरे याच्या हातावर चॉपरने वार केला. प्रशांत मोरे याला सोडविण्यासाठी गेलेल्या अनुराग माने आणि प्रशांत यादव यांच्यावरही महेश मिलके याने चॉपरने वार केले. महेश फरार असून पोलीस शोध सुरू आहे.