दिवाळीत म्हाडाच्या तीन हजार घरांची लॉटरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हक्काच्या घराचे स्वप्न साकार करण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्वसामान्यांना म्हाडाने चांगली बातमी दिली आहे. दिवाळीत तीन हजार घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज ट्विटरद्वारे केली.

गोरेगाव पहाडी येथील म्हाडाचा नियोजित प्रकल्प लवकरच पूर्ण होईल आणि या प्रकल्पातील सदनिका नागरिकांना वाटपासाठी खुल्या होतील. दिवाळीत तीन हजार घरांची लॉटरी निघेल, असे आव्हाड म्हणाले.