छोटय़ा आर्थिक व्यवहारांनाही ‘ओटीपी’ बंधनकारक करा! आरपीएफची रिझर्व्ह बँकेला विनंती्

406

रेल्वेच्या ई-तिकिटांचा घोटाळा करणारे दोन महत्त्वाचे सॉफ्टवेअर आरपीएफने निष्क्रिय केले असले तरी ऑनलाइन बाजारात आणखीही सॉफ्टवेअर सक्रिय आहेत. त्यामुळे आयआरसीटीसीची सुरक्षा यंत्रणा भेदून अशा तिकिटांची एकगठ्ठा ऑनलाइन खरेदी रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेला छोटय़ा आर्थिक व्यवहारासाठीदेखील ओटीपी बंधनकारक करण्यास विनंती केली असल्याचे आरपीएफचे डीजी अरुण कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच अशा प्रकरणात सायबर तपास तसेच आयटी ऍक्ट लावण्यासाठी रेल्वे कायद्यात लवकरच बदल करून कठोर शिक्षा आणि दंडाच्या रकमेत वाढ करण्याची तरतूद रेल्वे बोर्ड करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

तत्काळ ई-तिकीट रॅकेटमागे मनी लॉण्डरिंग आणि दहशतवादी कारवायांसाठी वापर होत असल्याचे रेल्वे सुरक्षा बलाने महिनाभरापूर्वी उघडकीस आणले होते. तरी ऑनलाइन बाजारात अशी आणखीही सॉफ्टवेअर सक्रिय आहेत. रिझर्व्ह बँक आठ हजारांखालील रकमेच्या व्यवहारात ओटीपी न विचारता केवळ कॅप्चा विचारते. त्याचा फायदा दलाल घेत असतात. म्हणून छोटय़ा रकमेच्या व्यवहारासाठी ‘ओटीपी’ पासवर्ड  बंधनकारक करण्यासाठी रिझर्व्ह बँकेला विनंती केली असून त्यास बँकेकडून अद्याप काहीही उत्तर आले नसल्याचे अरुण कुमार यांनी सांगितले.

मोबाईलवरूने तिकीट बुक करणे सोपे होणार

आयआरसीटीसीने मोबाईलवरूनच रेल्वे तिकिट बुकिंगसाठी सॉफ्टवेअर विकसित केले असून त्यामुळे तिकीट घोटाळ्यांना आळा बसणार आहे. तसेच आयआरसीटीच्या बेवसाइटमध्ये नवीन भक्कम सुरक्षाप्रणाली विकसित केली आहे. नवीन या रॅकेटमध्ये आंतरराष्ट्रीय ‘टेररफंडिंग’ असल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणात 79 जणांना अटक झाली असली तरी या प्रकरणाचा म्होरक्या दुबईत पसार झाला आहे. या घोटाळ्यातील 80 टक्के वाटा असलेल्या सॉफ्टवेअरना निक्रिय केले आहे. या प्रकरणात 30 कोटी रुपयांची प्रवास झालेली तिकिटे जप्त झाली आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या