
सामना ऑनलाईन । भोपाळ
आपली भूक शमवण्यासाठी वाघ इतर वन्य प्राण्यांची शिकार करतो. परंतु मध्य प्रदेशमधील एका राष्ट्रीय उद्यानात वर्चस्वाच्या लढाईत वाघाने एका वाघीणीचे तुकडे तुकडे केले आहे. मध्य प्रदेशच्या कान्हा राष्ट्रीय उद्यानातील ही घटना असून वाघीणीचे अवशेष वनअधिकार्यांना आढळल्याने ही बाब उघड झाली आहे.
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार एखादा वाघ दुसर्या वाघाची शिकार करणे हे सामान्य बाब असल्याचे सांगितले परंतु एका वाघाने वाघीणीला मारणे ही बाब दुर्मिळ असल्याचे म्हटले आहे.
वनधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार वर्चस्वाच्या लढाईत एक वाघ आणि दोन वर्षीय वाघीणीची लढाई झाली यात वाघ वरचढ होऊन वाघीणीला आपला जीव गमावावा लागला. वाघीणीच्य मृत्यूनंतर वाघाने वाघीणीचे तुकडे तुकडे केले. राष्ट्रीय उद्यानात वनाधिकारी पेट्रोलिंगसाठी गेल्यावर त्यांना मृत वाघीणीचे अवशेष मिळाले. यात तिची कातडी आणि हाडे होते.
मिळालेल्या अवशेषांवर वाघाने वाघीणीला मारल्याचा अंदाज वनाधिकार्यांनी व्यक्त केला आहे. शवविच्छेदनानंतरच खरे कारण कळेल असे अधिकार्यांनी सांगितले.
वर्चस्वाच्या लढाई वाघांची शिकार ही बाब सामान्य असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. परंतु आपल्याच समुहातील वाघीणीला मारणे ही बाब गंभीर असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. गेल्या सहा वर्षात 105 वाघांचा मृत्यू झाला आहे. तर आपसांतील लढाईत 39 वाघांचा मृत्यू झाला आहे.


























































