दुर्मीळ क्षण कॅमेऱ्यात कैद, वाघिणीची पाच बछड्यांसोबत ‘सवारी’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खीरी येथील वाघांसाठीच्या रिझर्व्ह जंगलामध्ये दुर्मीळ क्षण कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे. येथे पर्यटकांनी एका वाघिणीला पाच बछड्यांसोबत जंगलाची सवारी करताना टिपले. वनतज्ज्ञांनी वाघिणीने पाच बछड्यांना जन्म देण्याचा क्षण दुर्मीळ असल्याचे सांगितले.

वाघांसाठीच्या रिझर्व्ह असणाऱ्या या जंगलामध्ये पर्यटनासाठी येणाऱ्या सिद्घार्थ सिंह आणि त्यांचा सुपुत्र अभ्यूद्य यांनी आपल्या कॅमेऱ्यामध्ये वाघिणीला पाच बछड्यांसोबत टिपले. हा फोटो समोर आल्यानंतर वनविभागाने बछड्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पावले उचलली असून व्याघ्रप्रकल्पाचे दरवाजे सहा महिन्यानंतर पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहेत. यासह सुरक्षाव्यवस्था आणि पेट्रोलिंगमध्येही वाढ करण्यात आली आहे.

‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना सिद्धार्थ सिंह म्हणाले की, ‘आम्ही गेल्या चार वर्षापासून या वाघिणीला पाहात आहोत. आम्ही तिला बेलडंडा वाघिण म्हणतो. तिची तुलना रमथंभौरमधील मछली वाघिणीशी केली जाते. ही वाघिण पर्यटकांसाठीच्या रस्त्यांवर अनेकदा फिरताना आढळते. शनिवारी आम्ही तिचा व्हिडीओ शूट केला. त्यावेळी ती रस्त्यावर शांत बसली होती. काही वेळाने तिने आपल्या बछड्यांना बोलावले. तेव्हा तिने पाच बछड्यांना जन्म दिल्याचे आम्हाला समजले. याआधी वनविभागाने चार बछड्यांसोबत तिचा फोटो काढला होता परंतु तिने चार नाही तर पाच बछड्यांना जन्म दिल्याचे आमच्या कॅमेऱ्यात कैद झाले.’

tiger

दरम्यान, डब्ल्यूडब्ल्यूएफ इंडियाचे अधिकारी डॉ. मुदित गुप्ता यांनी वाघिणीने पाच बछड्यांना जन्म देणे दुर्मीळ घटना असल्याचे म्हटले.