टिक टॉकच्या स्मार्टफोनवरच बनवा खास व्हिडीओ, 4 कॅमेऱ्यांसह मिळणार जबरदस्त फिचर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
टिक टॉकच्या स्मार्टफोनवरच बनवा खास व्हिडीओ,  4 कॅमेऱ्यांसह मिळणार जबरदस्त फिचर
जगभरात टिक टॉक ने अनेक लोकांना वेड लावले आहे अभिनेत्यांपासून ते सामान्य लोक टिक टॉकचा वापर मोठ्या संख्येने करताना दिसतात. टिक टॉकमुळे लोकांमधील अभिनयाची रुची दिसून आली. आपला अभिनय सादर करण्याचा एक सोशल मंच युझर्सना उपलब्ध झाला. या अॅपवरून अनेक जण चित्रपटातील डायलॉग वापरून, तर काही जण विनोदी पद्धतीने व्हिडीओ करून प्रसिद्ध होतात. टिक टॉकचा वापर पैसे कमवण्यासाठी देखील केला जातो. आता टिक टॉक वापरणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. टिक टॉक कंपनीने चीनमध्ये प्रथमच चार कॅमेरे असलेला स्मार्टफोन ”स्मार्टिसन जिआंगुओ प्रो 3” लाँच केला आहे. चीनमध्ये या फोनची किंमत 29,000 रुपये इतकी असून  8 जीबी + 256 जीबी असणारे वेरिएंट ची किंमत 32,000 आहे. तर 12 जीबी +256 जीबी असणाऱ्या वेरिेएंट ची किंमत 36,000 रुपये इतकी आहे.स्मार्टफोनचे फिचर्स-

या मोबाईलचा प्रोसेसर आणि कॅमेरा दोन्ही जबरदस्त आहे. हा मोबाईल 6.39 इंचाचा असून फुल एचडी + AMOLDचा डिसप्ले देण्यात आला आहे की जो 1080 X 2340 पिक्सेल रिझोलूशन सोबत आहे. हा स्मार्टीसन मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करतो. या मोबाईल स्नॅपड्रॅगन 855+ प्रोसेसर वापरण्यात आला आहे. मोबाईलला 12 जीबी पर्यंत रॅम आणि 256 जीबी असे स्टोरेज ऑप्शन देण्यात आले आहे. 256 जीबी इंटरनल वेरिएंटचा फास्ट डेटा ट्रान्सफर करण्यासाठी UFS 3.0 वापरण्यात आले आहे.

चार कॅमेरे असणारा मोबाईल-

हा मोबाईल चार कॅमेऱ्यांचा असून यात 48 मेगापिक्सलच्या प्रायमरी सेंसर सोबत 13 मेगापिक्सलचा वाईड अँगल कॅमेरा, 8 मेगापिक्सलचा टेलिफोटो लेंस आणि 5 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा दिला आहे. प्रायमरी कॅमेरा Sony IMX586 सेंसर सोबत येतो आणि सेल्फीसाठी फ्रंट कॅमेरा 20 मेगापिक्सलचा आहे.