‘मी तुम्हाला खूप इरिटेट करतेय ना’, म्हणत 18 वर्षीय टिकटॉक स्टारची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेतील प्रसिद्ध टिकटॉक (TikTok) स्टार तरुणीने वयाच्या 18 वर्षी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. डेझरिया क्विंट नोएस (Dazhariaa Quint Noyes) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहेत. डेझरिया ही टिकटॉकवर Dee या नावाने प्रसिद्ध होती आणि सोशल मीडियावरही तिचे लाखो फॉलोअर्स होते. विशेष म्हणजे आत्महत्या करण्यापूर्वी तिने एक व्हिडीओ शेअर केला असून यात तिने ही माझी अखेरची पोस्ट असल्याचे म्हटले होते.

‘डेली मेल’ने दिलेल्या वृत्तानुसार, आत्महत्या करण्यापूर्वी डेझरिया क्विंट नोएस (Dazhariaa Quint Noyes) हिने एक व्हिडीओ पोस्ट शेअर केली. या व्हिडीओखाली कॅप्शनमध्ये तिने, ‘ठिक आहे, मला माहिती आहे की मी तुम्हाला खूप इरिटेट करतेय. मात्र आता ही माझी अखेरची पोस्ट आहे.’

दरम्यान, डेझरिया हिच्या कुटुंबियांनी तिच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. डेझरिया हिने आत्महत्या केल्याची माहिती त्यांनी प्रसारमाध्यमांना दिली. तिचे वडील रहीम अल्‍ला यांनी याबाबत GoFundMe नावाच्या एका पेजवर लिहिले आहे.

‘ 8 फेब्रुवारी रोजी माझी मुलगी आम्हाला सोडून गेली. ती माझी मैत्रीण होती. मी माझ्या मुलीचा दफनविधी करण्यासाठी तयार नव्हतो. ती खूप आनंदी होती. मी जेव्हा घरी यायचो तेव्हा मला रस्त्यावरून येताना पाहून ती खूप आनंदी व्हायची. मला एवढेच वाटते की ताणतणाव आणि आत्महत्येच्या विचारांबाबत तिने माझ्याशी चर्चा करायला हवी होती. आपण काहीतरी मार्ग काढला असता. आता मी जेव्हा घरी येतो तेव्हा माझी वाट पाहताना ती मला दिसत नाही’, अशी पोस्ट डेझरियाच्या वडिलांनी लिहिली आहे.


View this post on Instagram

A post shared by Dee (@dazhariaa)

दरम्यान, 18 वर्षी डेझरिया ही सोशल मीडियावर प्रसिद्ध होती. टिकटॉक, इन्स्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोअर्स होते. तिचे व्हिडीओ देखील लोकांना आवडत होते. परंतु तिने आत्महत्या केल्याने चाहत्यांनाही धक्का बसला आहे.