निवडणुकांमुळे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षांच्या तारखांत बदल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

21 ऑक्टोबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमुळे मुंबई विद्यापीठाने तब्बल 68 परीक्षांच्या 303 पेपर्सच्या तारखांमध्ये बदल केला आहे. प्रत्यक्ष मतदान (21 ऑक्टोबर) व त्यानंतरचा दुसरा दिवस 22 ऑक्टोबरला विद्यापीठाच्या कोणत्याही परीक्षा होणार नसून या दोन दिवशी होणाऱ्या परीक्षांचे विद्यापीठाने फेरनियोजन केले आहे.

विज्ञान व तंत्रज्ञान शाखेच्या 22 परीक्षांचे एकूण 60 पेपर्स, वाणिज्य व व्यवस्थापन शाखेच्या 22 परीक्षांचे 57 पेपर्स, मानवताशास्त्र शाखेच्या 11 परीक्षांचे 165 पेपर्स तसेच आंतरविद्या शाखेच्या 13 परीक्षांचे 21 पेपर्स यांचे फेरनियोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने एकूण 68 परीक्षांचे 303 पेपर्सच्या परीक्षांच्या तारखा बदलण्यात आल्याचे परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक डॉ.विनोद पाटील यांनी स्पष्ट केले.

ज्या विषयांच्या परीक्षांच्या तारखांत बदल करण्यात आला आहे. त्यांचे सुधारित वेळापत्रक मुंबई विद्यापीठाच्या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आले असून विद्यार्थ्यांनी सुधारित वेळापत्रक लक्षपूर्वक पाहून अभ्यासाचे नियोजन करावे, असेही पाटील यांनी सांगितले.