
सामना ऑनलाईन, मुंबई
डेनिम हे प्रत्येक ऋतूमध्ये कापरलं जाणारं कापड. सतत ट्रेंडमध्ये असलेला पोषाख म्हणून डेनिमची ओळख आहे. त्यामुळे तरुणाईच्या वॉर्डरोबमध्ये डेनिम हमखास पाहायला मिळते. यामध्ये सध्या ‘डेनिम ऑन डेनिम’ची क्रेझ तरुणाईमध्ये जास्त पाहायला मिळतेय.
डेनिम ऑन डेनिम
डेनिमचे शर्ट घाला, त्याच्या आत तुम्ही सिंग्लेट घाला आणि खाली डेनिम बुटलेग जीन्स घाला. जर तुम्हाला या शर्टसोबत जरा कॅज्युअल स्टाइल करायची असेल तर अशा डेनिम शर्टाची बटणं उघडून त्याच्या आत प्रिंटेड किंका प्लेन कॉटन स्पेगेटी घालू शकता. हा लुक सध्या तरुणाईमध्ये जास्तच पाहायला मिळतोय. तो दिसायलाही आकर्षक आणि रुबाबदार वाटतो.
लेस आणि बुटलेग डेनिम
मांडीवर कट केलेल्या रिप्ड पॅण्टला लेस घालायची. रिप्ड जिन्सला कट असलेल्या जागी छान काळय़ा किंवा पांढऱया रंगाची लेस लावल्याने भन्नाट लुक येतो आणि थोडं हटकेही वाटतं.
डेनिमसोबत व्हाईटलेस
डेनिमसोबत व्हाईटलेस हा पोषाखही सध्या फॅशनमध्ये आहे. डेनिम कट करून हॉट पॅण्ट करायची. त्याच्या खाली लेसचे फॅब्रिक वापरायचे. त्यातून पाय दिसतो. डेनिमसोबत व्हाईटलेस प्रसिद्ध आहे.
डेनिम कुर्ता
सध्या बाजारात डेनिमचे कुर्ते पाहायला मिळत आहेत. प्लेन ए-लाइन, शर्ट, ड्रेस स्टाइल, फ्लेअर अशा स्करूपांत हे कुर्ते तरुणाईला भुरळ घालत आहेत.
हे लक्षात ठेवा…
- डेनिमचा रंग त्वचेशी मिळताजुळता निवडावा.
- पार्टी, ऑफिस किंका सहलीसाठी डेनिम विविध रंगाची घालावी.
- जीन्स घेताना कमरेच्या मापाकडे लक्ष द्यावे..
- आपल्या बांध्यानुसार डेनिम पसंत कराके.
- रंगाबरोबरच डिझाईन आणि स्टाइल हे दोन्ही लक्षात घ्या.
- कलर डेनिम नेहमीच स्टायलिश दिसते.
- डेनिमचे फिकट निळे टॉप गडद रंगाच्या डेनिम जिन्सबरोबर उठून दिसतात.
- डेनिम-ऑन-डेनिम ही फॅशन करताना
- रिप्ड जीन्स उठून दिसतात.
डेनिमचा वनपीस
डेनिमचा गुडघ्यापर्यंतचा ड्रेस तुम्हाला सर्कात जास्त सुटसुटीत आणि सध्याच्या तप्त मोसमासाठी एकदम योग्य आहे. या ड्रेसची खासियत म्हणजे हा ड्रेस कोणत्याही समारंभासाठी किंका रोजच्या वापरासाठी योग्य ठरतो. म्हणजे एखाद्या डेनिम ड्रेसखाली तुम्ही कॅनकास किंका स्पोर्टस् शूज घालू शकता.






















































