Tips – जेवणानंतर लगेचच या गोष्टी करणे टाळा …

जेवणानंतर अनेकांना काही गोष्टी करण्याची सवय असते. जसे की सिगारेट ओढणे, चहा पिणे किंवा झोपी जाणे. पण आरोग्यासाठी नेमक्या याच गोष्टी हानीकारक आहेत. कारण या गोष्टी केल्याने त्याचा थेट तुमच्या पचनक्रियेवर परिणाम होतो आणि आरोग्य बिघडू शकते.

– सिगारेट ओढल्याने तुमची फक्त पचन क्रियाच बाधीत होत नाहीतर यामुळे कॅन्सरचाही धोका वाढतो.

– जेवण केल्यावर लगेच झोपल्याने गॅस व आतड्यांच्या संक्रमणाची शक्यता असते. म्हणूनच जेवण झाल्यानंतर शतपावली केल्यास त्याचा अन्न पचनासाठी नक्कीच फायदा होतो.

Tips – प्रोटीन, विटामिन्स, कॅल्शियमचा ‘खजिना’, जाणून घ्या द्राक्ष खाल्ल्याने होणारे फायदे

– जेवणादरम्यान किंवा जेवणानंतर फळे खाणे आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही. फळे नेहमी जेवणाच्या काही वेळेपूर्वी खायला हवी. त्यातही सकाळी नाश्त्यापूर्वी फळ खाणे सर्वाधिक फायदेशीर असते.

– जेवणानंतर लगेच अंघोळ करणेही योग्य नाही. अंघोळ करताना हात-पाय सक्रिय असतात. यामुळे या भागातील रक्तप्रवाह वाढतो. पोटातलाही रक्तसंचार वाढल्यामुळे पचनक्रिया प्रभावित होते.

Tips – तुम्हालाही नखे कुरतडण्याची सवय आहे, मग आधी हे वाचा

– जेवणानंतर अनेकांना घटाघटा पाणी पिण्याची सवय असते. परंतु जेवणानंतर साधारण 15-20 मिनिटांनी पाणी प्यायलेले कधीही चांगलं असते. कारण जेवताना किंवा लगेच जेवणानंतप पाणी प्यायल्यास तुमची पचनक्रिया प्रभावित होते.

– जेवणानंतर काही लोकांना चहा पिण्याची सवय असते. पण तसे करणेही त्रासदायक ठरू शकते. चहाच्या पानांमध्ये मोठ्या प्रमाणात आम्ल असते. यामुळे प्रथिनांच्या पचनावर वाईट परिणाम होऊन प्रथिनांची पचनक्रिया प्रभावित होते.

‘पादम’पंचीवर उपाय काय? वाचा सविस्तर…

आपली प्रतिक्रिया द्या