
आपल्या अनेक सवयी शरीरास धोकादायक असतात मात्र त्याबद्दलची थोडीही कल्पना आपल्याला नसते. फावल्या वेळेत किंवा तणावाच्या स्थितीत अनेकांना नखे कुरतडण्याची सवय असते. मात्र ही सवय आरोग्यास हानिकारक आहे.
– नखे खाल्ल्याने अनेकदा नखातील घाण तोंडावाटे शरिरात जाते. त्यामुळे पोटाचे विकार वाढू शकतात आणि आरोग्याच्या गंभीर समस्या होऊ शकतात.
– नखे खाल्ल्याने शरिरात ह्युमन पेपिलोमा नावाचा व्हायरस पसरतो आणि यामुळे हात, तोंड व ओठावर मस येऊ शकतो.
– नखे कुरतडल्याने पॅरोशिया नावाचा त्वचेचा संसर्ग होऊ शकतो. यामुळे बोटांना सूज येऊन ते लाल होऊ शकतात.
या सवयीपासून सुटका मिळवण्यासाठी काही उपाय करून पाहा…
– सतत चावण्याच्या सवयीमुळे काहीजण नखे चावण्यास सुरुवात करतात. त्यामुळे या सवयीला रामराम करायचा असल्यास च्युईंग गम, चणे-शेंगदाणे, गाजर यासारखे पदार्थ तोंडात ठेवावे.
– नखे वाढलेली असल्याने ती कुरतडण्याची सवय वाढते. त्यामुळे नखे वेळीच कापावी.
Tips – सावधान! रात्री उशिरा झोपताय? ‘या’ आजारांना देताय निमंत्रण
– ही सवय बंद करण्यासाठी हळूहळू प्रयत्न करत राहणे गरजेचे आहे.
– सवय सोडवायची असल्यास नखांना खराब चव असलेली नेलपेंट लावावी. त्यामुळे सवय सुटण्यास मदत होऊ शकते.
– नेलआर्ट केल्यानेही नखे कुरतडली जाणार नाही.
Tips – दात स्वच्छ आणि चमकदार ठेवण्यासाठी साधे उपाय, जाणून घ्या…



























































