
– उन्हाळ्यात जास्त घामाने त्वचेवर घामोळे येतात. घामोळे येऊ नये म्हणून दिवसातून एक-दोन वेळा थंड पाण्याने आंघोळ करा. त्वचेवरील खाज आणि जळजळ कमी करण्यासाठी अॅलोवेरा जेल लावा. घामोळ्यावर चंदनाची पेस्ट लावा.
– कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ करा, बॅक्टेरिया कमी होतात. सैल आणि कॉटनचे कपडे वापरा. घाम सुकू देऊ नका. लगेच पुसून टाका. टॅल्कम पावडर वापरा. त्वचा कोरडी राहाते. भरपूर पाणी प्यायल्याने शरीर थंड राहते. घामोळे कमी होतात.




























































