असं झालं तर, रेशन कार्डची ईकेवायसी करायची आहे…

नियमानुसार दर पाच वर्षांनी रेशनकार्ड ईकेवायसी करावी लागते.  त्यासाठी रेशनिंग ऑफिसमध्ये जायची गरज नाही. तुम्ही घरच्या घरी मोबाईलवरूनही ईकेवायसी करू शकता.

त्यासाठी मेरा रेशन किंवा आधार फेस आरडी अ‍ॅप इन्स्टॉल करा. अ‍ॅप ओपन करून तुमचे लोकेशन टाका. आधार नंबर, मोबाईलवरील ओटीपी टाका.

स्क्रीनवर आधार डिटेल्स दिसल्यानंतर फेस-ईकेवायसी हा पर्याय निवडा. पॅमेरा आपोआप ऑन होईल. फोटो क्लिक करून सबमिट करा. ईकेवायसी पूर्ण होईल.

ईकेवायसी झाली की नाही ते नंतर तुम्हाला तपासता येते. मेरा रेशन अ‍ॅप ओपन करू त्यावर तुम्हाला स्टेटस दिसू शकते. ईकेवासयी झाली नसेल तर एन दिसेल.

जर ऑनलाईन केवायसी करण्यात अडचण येत असेल तर तुम्ही जवळच्या रेशन दुकानात किंवा सीएससी पेंद्रात जाऊन ईकेवायसी पूर्ण करू शकता. कागदपत्रे सोबत घेऊन जा.