
उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज घेताना योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. बँका आणि वित्तीय संस्था देशात आणि परदेशात शिक्षणासाठी कर्ज पुरवतात.
शैक्षणिक कर्जासाठी पालक संयुक्त कर्जदार असतात. जर कर्जाची रक्कम जास्त असेल तर तारण द्यावे लागू शकते. मुलींना काही प्रमाणात व्याजदरात सवलत मिळते.
एका बँकेवर विसंबून न राहता, अन्य बँकांचे व्याजदर किती आहे याची माहिती घ्या. शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी लागण्याची शक्यता तपासा.
शिक्षण चालू असताना आणि शिक्षण संपल्यानंतर काही काळासाठी (साधारणपणे 6 महिने ते 1 वर्ष) हप्ते न भरण्याची सुविधा असते. त्याला मोरोटोरियम पीरियड म्हणतात.
या कालावधीत व्याजाची गणना कशी होते याची स्पष्ट माहिती घ्या. कर्जमंजुरीच्या पत्रातील प्रत्येक अट काळजीपूर्वक वाचा. कर्जाची परतफेड 15 वर्षांपर्यंत करता येते.


























































