टीप्स : औदुंबर

साक्षात दत्ताचा निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणजे औदुंबर वृक्ष. उंबराच्या झाडाला पार बांधला तर त्या झाडाला औदुंबर म्हणतात. म्हणून घराजवळ औदुंबर वृक्ष येणे म्हणजे पारंपरिक, पिढय़ान्पिढय़ा दत्त अधिष्ठान असणे. या औदुंबरामुळे आपल्या आयुष्यात काय फायदे होतात ते पाहूया.

  • औदुंबराच्या झाडामुळे त्या जमिनीत पाण्याचा मुबलक साठा असल्याचे संकेत मिळतात. या झाडाच्या सुकलेल्या काडय़ा होमहवनात समिधा म्हणून अर्पण करतात. या झाडाचे फूल कधीच दिसत नाही.
  • भक्तीचे हे कर्ज तिथल्या तिथे फेडत राहावे. प्रत्येक जन्मात. आज उपटून टाकाल ठीक आहे, पण याचे परिणाम भावी काळात अनुभवास येत राहतील.
  • औदुंबर झाडाची पाने काटून विंचू चावल्यावर लावल्यास वेदना कमी होतात असे आयुर्वेदात सांगितले आहे. गालगुंडावर या झाडाच्या चिकाचा लेप लावतात. या झाडाच्या पानांवरील फोडांचा उपयोग वांतीवर केला जातो. याची फळे व सालीचा रस अंगाला चोळून आंघोळ केल्यास कुष्ठरोग बरा होतो.
  • उंबराची फळे खाण्यासाठी वापरतात. याची पाने शेळी- बकरी आवडीने खातात. पक्षी या झाडाची फळे खातात. गोकर, उचकी, अतिसार, उन्हाळी, मधुमेह इत्यादी रोगांवर उंबराची फळे, फुले व पाने उपयोगी पडतात. विषावर उतारा म्हणूनही झाडाच्या चिकाचा उपयोग करतात.
  • उंबराच्या झाडावर एक दैवी फूल असते जे मुख्यतः कोणालाही दिसत नाही. ज्याला ते फूल दिसते त्याच्या भक्तीला दत्त माऊलीनी प्रतिसाद दिला समजावे.
  • वास्तुशास्त्रात उंबराच्या लाकडाचा दाराच्या चौकटीत उंबरा (उंबरठा) बनविण्यासाठी वापर होत असे. यामुळे सरपटणारे प्राणी घरात शिरण्यासही अटकाव व्हायचा.
  • औदुंबर वृक्षाचा पाला, फळे, साली गाईला खायला घातल्याने गाय सुदृढ होते असा भाविकांमध्ये समज आहे. या झाडाच्या सावलीत बसून पवित्र ग्रंथ, पोथ्या वाचन केल्याने फळ मिळते.
आपली प्रतिक्रिया द्या