असं झालं तर…डेबिट कार्ड चालत नसेल तर…

एटीएममधून पैसे काढण्यासाठी डेबिट कार्डचा वापर करतो, परंतु कधी-कधी डेबिट कार्ड काम करत नाही. अशा वेळी पैसे काढणाऱयाला मानसिक त्रास होतो.

जर तुमचे डेबिट कार्ड पैसे काढताना चालत नसेल तर सर्वात आधी तुमच्या खात्यात पुरेसे पैसे आहेत का, हे ऑनलाईन बँकिंग किंवा अॅपद्वारे तपासून घ्या.

पैसे काढताना तुम्ही पिन नंबर योग्य टाकत आहात का याचीही खात्री करा. चुकीचा पिन टाकल्यास कार्ड तात्पुरते ब्लॉक केले जाऊ शकते.

डेबिट कार्डची मुदत संपली आहे का हेही तपासून घ्या. डेबिट कार्डमधून रोजची व्यवहाराची मर्यादा ओलांडली आहे का, हे तपासून पाहा.

कार्ड खराब झाल्यास काम करू शकत नाही. बँकेला संशयास्पद व्यवहार आढळल्यास कार्ड ब्लॉक केले जाऊ शकते. डेबिट कार्डसाठी बँकेच्या शाखेत जाऊन चौकशी करा.