कपडय़ांना कुबट वास येतोय? हे करून पहा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सततच्या पावसामुळे कपडे नीट वाळत नाहीत. त्यामुळे त्यांना कुबट वास येतो. हा वास घालवण्यासाठी कपडे धुताना पाण्यात बेकिंग सोडा किंवा व्हिनेगर मिसळा. यामुळे दुर्गंधी दूर होईल.

ओल्या कपडय़ांचा वास घालवण्यासाठी वॉशिंग मशीनमध्ये सुगंधी लिक्विडचा वापर करा.

इस्त्रीचा वापर करून तुम्ही किंचित ओलसर असलेले कपडे झटपट वाळवू शकता. कपाटात कपडे ठेवताना त्यात डांबर गोळ्या, कापूर किंवा कडुलिंबाची पाने ठेवा. ओले कपडे लगेच धुवा.