तिरुपतीला भक्तांनी चढवले 50 कोटींच्या रद्द नोटांचे दान

628

आंध्रप्रदेशातील जगप्रसिद्ध भगवान तिरुपती बालाजी मंदिरात गेल्या काही वर्षांत भाविकांनी नोटबंदीच्या काळात रद्द झालेल्या जुन्या 500 आणि 1000 रुपये मूल्यांच्या नोटांचे दान मोठय़ा प्रमाणात चढवले आहे. 2016 पासून आतापर्यंत अशा रद्द नोटांचे 50 कोटी रुपयांचे दान मंदिर ट्रस्टकडे जमा आहे. हे पैसे सांभाळणे आता ट्रस्टला कठीण जात आहे. त्यामुळे केंद्र सरकारने या जुन्या नोटा बदलून देत ट्रस्टला आर्थिक संकटाच्या काळात दिलासा द्यावा, असे साकडे तिरुपती ट्रस्टचे चेअरमन कायकी सुब्बारेड्डी यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना घातले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या