अभिप्राय – संघर्षाच्या प्रेरक कथा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
  • अस्मिता प्रदीप येंडे

मानवी शरीरात असूनही दिसून न येणारा अवयव म्हणजे मन. ज्या भावभावना उमटतात त्या अंतरंगात. मन हे चंचल असते. झोपेतसुद्धा विचार प्रक्रिया सुरू असते. एका ठिकाणी बसून हवे तिथे मन भटकत असते.

जाणीव व बुद्धी यांच्यामुळे घडणाऱया ज्ञान, विचार, मत, स्मरणशक्ती, भावना, कल्पनाशक्ती, तर्कशक्ती, चेतना या गोष्टी ज्या ठिकाणी होतात त्या ठिकाणाला मन असे म्हणतात. या सर्व गोष्टी या मेंदूद्वारे होणाऱया प्रक्रिया आहेत. मानवी मन ही या जगात सर्वात अनाकलनीय अशी गोष्ट आहे.

डॉ. अद्वैत पाध्ये हे मनोविकार तज्ञ आहेत. त्यांचे ‘तितिक्षा ः कथा परिश्रमाच्या’ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले. मानसिक आरोग्य या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर त्यांनी लेखन करून मानसिक समस्यांवर प्रकाश टाकला आहे. सध्याची परिस्थिती पाहता माणसाच्या आयुष्यात नैराश्य आले आहे, कोणी हतबल झाले आहे, कोणाची जगण्याची इच्छा संपून गेली आहे, कोणी पूर्ण उद्ध्वस्त झाले आहे, कोणाची जवळची व्यक्ती निधन पावली आहे, पण काही अशी मंडळी आहेत, ज्यांनी या नकारात्मकतेकडे एक नवी संधी म्हणून पाहिलं आणि आयुष्याची नवी सुरुवात झाली.

व्यास क्रिएशनने प्रकाशित केलेल्या ‘तितिक्षा’ या कथासंग्रहात जगण्याची नवी ऊर्जा देण्याची ताकत आहे. जीवनात हतबल झालेल्या, मानसिक ताणतणावात, नैरश्यात असणाऱया व्यक्ती कशा पद्धतीने  जगण्याकडे पाहतात, त्यातून ते कसे बाहेर पडतात, याची संघर्षमय कथा यात आहेत. डॉ. अद्वैत पाध्ये हे मनोविकारतज्ञ असल्यामुळे अशा विविध समस्यांतून जाणाऱया व्यक्तींना ते भेटत असतात, त्यांच्याशी संवाद साधत असतात. त्या वेळी आलेले अनुभव या कथांमध्ये दिसून येतात. या संघर्षाच्या कथा सकारात्मक दृष्टिकोन देणाऱया आहेत. या वाचल्यानंतर जीवन जगण्याची प्रेरणा मिळते. मानसिक आरोग्य योग्य रीतीने सांभाळण्याची शिकवण देणारे हे पुस्तक आहे.

या पुस्तकात ज्येष्ठ नागरिकांच्या मानसिक समस्यांकडे लक्ष पेंद्रित केले आहे. त्यासोबतच तरुणांच्या कथाही यात समाविष्ट केलेल्या आहेत.

सध्याचे जीवनच असे आहे की, छोटय़ा-छोटय़ा गोष्टींतून नैराश्य येतं, पण सकारात्मक विचारसरणी कायम ठेवली पाहिजे. या पुस्तकातील कथा इतक्या प्रेरणादायी आहेत की, प्रत्येकाला प्रेरित करतील. आपल्या समस्यांवर मात करत, संघर्ष करत अनेकांनी जीवनाला नवी सुरुवात केली आहे. जे घडून गेले आहे त्याचा विचार न करता पुढे येणारा प्रत्येक दिवस भरभरून जगण्याची उर्मी निर्माण करणारे हे पुस्तक वाचलेच पाहिजे.

या पुस्तकाद्वारे सकारात्मक संदेश दिला आहे की, मानसिक समस्या असली की, लोक डॉक्टरांकडे लोक काय म्हणतील, वेड लागल्याची भावना अशा गोष्टीमुळे जाणे टाळतात. ही चुकीची भावना दूर करून अशा समस्या असल्यास मानसोपचार तज्ञांकडे जाणे, त्यांना आपली समस्या सांगून योग्य ते औषधोपचार घेणे हितकारक आहे.

‘तितिक्षा’ पुस्तकातील कथा नक्कीच सगळ्यांना प्रेरित करतील. एक सुखी, समाधानी जीवन जगण्यास उभारी देईल. कथेची शीर्षके आकर्षक आहेत. सोबतच असलेली रेखाचित्रेसुद्धा समर्पक आहेत. पुस्तकाचे मुखपृष्ठ व आतील रेखाचित्रे चित्रकार कवी, लेखक रामदास खरे यांनी रेखाटली आहेत. मनाचे आरोग्य जपण्यासाठी, जगणं समृद्ध करण्यासाठी हे पुस्तक संग्रही असायला हवे.

तितिक्षा

लेखक ः डॉ. अद्वैत पाध्ये

मुद्रक ः व्यास क्रिएशन्स

मूल्य ः रु. 150/-