टिटवाळावासीयांना मिळणार मजबूत रस्ता, शिवसेनेच्या पाठपुराव्यास यश; काँक्रीटीकरणाच्या कामाचा शुभारंभ

टिटवाळ्यातील धर्मवीर आनंद दिघे मार्ग ते विनायक सोसायटी या दरम्यानच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे. यामुळे टिटवाळावासीयांना मजबूत रस्ता मिळणार आहे. शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांच्या निधीतून काँक्रीट रस्ता व गटारांचे बांधकाम आदी विकासकामे करण्यात येत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या पाटपुराव्याला अखेर यश मिळाल्यामुळे टिटवाळ्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

टिटवाळ्यातील रस्ते दुरुस्ती, कचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा, दिवाबत्ती यांसह विविध नागरी समस्या सोडवण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी नगरसेवक व उपशहरप्रमुख किशोर भोईर हे प्रयत्नशील आहेत. माजी नगरसेवक सुरेश भोसले व प्रदीप भोईर यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. येथील नागरिकांना जात-विभागापेक्षा जास्त चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून आपला प्रयत्न कायम राहील, असे भोईर यांनी सांगितले.

या कार्यक्रमास पंडित कुलकर्णी, युवासेना अधिकारी प्रवीण भोईर, तेजश्री भोईर, रेणुका कर्वे, महिला संघटक राजेश्वरी गुप्ता, रितेशा हिर्लेकर, लक्ष्मण पाटील, राजेश दीक्षित, दिलीप पातकर, संभाजी मोरे, मनीष चव्हाण, संतोष पवार, ज्येष्ठ शिवसैनिक बाळा भोईर, भाऊसाहेब पगारे, प्रवीण शिरसाट, संजय विश्वकर्मा, शिवमिलन निर्मल, संजय मांडे, अक्षय भोय, प्रतीक भोईर, रमेश डगले, सुशांत म्हात्रे, किशोर नीलमकर, शरद कदम, सुनील वर्मा, तुषार जाधव, माजी पोलीस निरीक्षक कुंभार, सुरेश सुतार आदी उपस्थित होते.