शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेच्या वतीने युवती पदाधिकारी निर्धार मेळावा रविवार, 25 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 ते रात्रौ 9 या वेळेत राष्ट्रीय मिल मजदूर संघ हॉल, भोईवाडा येथे संपन्न होणार आहे. हा निर्धार मेळावा यशस्वी करण्यासाठी युवासेना युवती पदाधिकारी सज्ज झाले आहेत. या निर्धार मेळाव्याला रश्मी ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे, अशी माहिती युवा सेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.
या निर्धार मेळाव्यादरम्यान युवासेना युवती पदाधिकारी सक्षमीकरण व वाढीसाठी विविध विषयांवर सायंकाळी 6.30 वाजल्यापासून शिवसेना महिला नेत्यांचे मार्गदर्शन होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने शिवसेना उपनेत्या विशाखा राऊत, शिवसेना विभाग संघटक – उपनेत्या किशोरी पेडणेकर, शिवसेना उपनेत्या-खासदार प्रियंका चतुर्वेदी, शिवसेना उपनेत्या शीतल देवरुखकर-शेठ, शिवसेना सचिव सुप्रदा फातर्पेकर व इतर पदाधिकारी विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत.
या निर्धार मेळाव्यास मुंबई व ठाण्यामधील सर्व युवती सेना प्रमुख पदाधिकारी यांचा सहभाग असणार आहे. शिवसेना महिला नेत्यांच्या मार्गदर्शनाने युवती पदाधिकाऱयांचा उत्साह नक्कीच वाढणार आहे. आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून हा निर्धार मेळावा युवती पदाधिकाऱयांमध्ये चैतन्य निर्माण करणारा असेल. युवती पदाधिकारी निर्धार मेळावा यशस्वी होण्याकरिता नियोजनासाठी विविध युवासेनेच्या युवती पदाधिकाऱयांवर जबाबदारी सोपविली असून असंख्य युवासेना युवती पदाधिकारी मेहनत घेत आहेत.
स्थळ – राष्ट्रीय मिल मजदूर संघ, भोईवाडा
वेळ – सायंकाळी 6.00 ते 9.00