
उत्तर प्रदेशमधील विजयानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत नव्या मंत्रिमंडळ रचनेविषयी चर्चा केली. योगींवर पंट्रोल ठेवण्यासाठी मंत्रिमंडळात दिल्लीकरांचे खासम्खास असलेल्या तिघांचा उपमुख्यमंत्री म्हणून समावेश होणार असल्याचे समजते. त्यामुळे बहुमत मिळाले असले तरी योगींसाठी दुसरी टर्म कटकटीची ठरण्याची शक्यता आहे.
योगी अदित्यनाथांची पहिली टर्म वादग्रस्त ठरली होती. निवडणुकीत यश मिळाले असले तरी सामाजिक समीकरणे हाताळण्यात ते अपयशी ठरले. योगींनी स्वतŠकडील गृहखात्याचा वापर राजकीय हितासाठी केल्याचा आरोप भाजपच्याच नेत्यांकडून होतो. त्यात दिल्लीकरांनाही योगींवर पंट्रोल ठेवायचा असल्याने नव्या मंत्रिमंडळात तीन उपमुख्यमंत्री नेमण्यात येणार असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सचिव असलेले पूर्वाश्रमीचे नोकरशाह अरविंद शर्मा यांना उपमुख्यमंत्रीपदासह गृहखाते दिले जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर जाटव समाजाच्या प्रभावी नेत्या बेबीरानी मौर्या यांचाही उपमुख्यमंत्री म्हणून समावेश होऊ शकतो. विद्यमान उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांचा निवडणुकीत पराभव झाला. यामागे योगींचाच हात असल्याची चर्चा आहे. असे असले तरी योगींना शह देण्यासाठी विधान परिषदेचा कार्यकाळ शिल्लक असलेल्या केशवप्रसादांचीही पुन्हा उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.
होलाष्टकाचा कालावधी अशुभ मानला जात असल्याने होळी पौर्णिमेनंतर योगी अदित्यनाथ दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील, अशी माहिती पक्षातील सूत्रांनी दिली.



























































