बारावी फेरपरीक्षेचा आज निकाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

बारावी फेरपरीक्षेचा ऑनलाइन निकाल आज दुपारी 1 वाजता ऑनलाइन जाहीर होणार आहे. www.maharesult.nic.in या वेबसाइटवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईल. वेबसाइटवर विषयनिहाय गुण उपलब्ध होतील तसेच या माहितीची प्रिंटदेखील काढता येईल.

ऑनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर 27 ऑगस्टपासून विद्यार्थी गुणपडताळणीसाठी अर्ज करू शकतात. 5 सप्टेंबरपर्यंत गुणपडताळणीसाठी अर्ज करण्याची मुदत आहे. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेची छायाप्रत हवी आहे त्यांनी ऑनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर 15 सप्टेंबरपर्यंत विभागीय शिक्षण मंडळाकडे अर्ज करायचा आहे. तसेच उत्तरपत्रिकेच्या

पुनर्मूल्यांकनासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दुसर्‍या दिवसापासून पाच दिवसांत अर्ज करायचा आहे, अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाचे प्रभारी सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली.