२ वर्षांचा चिमुरडा बनला चेन स्मोकर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। जावा

सिगारेटचे व्यसन शरीरासाठी हानीकारक आहे हे सर्वश्रुतच आहे. पण जर हे व्यसन एखाद्याला लहानपणापासूनच लागले तर. हा नुसता विचारही मनाला अस्वस्थ करून जातो. पण जावा येथे अशाच एका २ वर्षाच्या चिमुरड्याला सिगारेट ओढण्याचे व्यसन लागले आहे. या व्यसनापायी तो इतक्या सिगारेट ओढू लागला आहे की लोकं त्याला आता चेन स्मोकर म्हणून ओळखू लागले आहेत. रापी असे त्याचे नाव आहे.

‘द सन’ या वृत्तपत्रात रापीच्या व्यसनाबदद्ल माहिती देण्यात आली आहे. सिगारेट मिळाली नाही तर रापी आक्रमक होतो. स्वत:चे केस उपटू लागतो. तर अनेकवेळा त्याने सिगारेटसाठी भीकही मागितली होती. यामुळे मीच त्याला दिवसाला दोन सिगारेटची पाकिट आणून द्यायचे. असे त्याच्या आईने द सनला सांगितले आहे. रापीच्या आईचे सिगारेटचे स्टॉल आहे. अनेकजण स्टॉलवरून सिगारेट खरेदी करायचे सिगारेट ओढायचे व त्याचे थोटूक तिथेच फेकून द्यायचे. रापी लहान असल्याने तो लगेच ते थोटूक तोंडात घालायचा. स्टॉलवर येणाऱ्या लोकांना अनेकवेळा त्याने सिगारेट ओढताना बघितलं होतं.यामुळे थोटूक तोंडात धरत तो त्यांची नक्कल करू लागला. हळू हळू त्याला सिगारेट आवडू लागली व त्याचे व्यसन जडले.

दरम्यान, एवढ्या लहान मुलाला सिगारेट ओढताना बघून अनेकांना धक्का बसला होता. त्यातूनच काहीजणांनी त्याला रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी त्याची सिगारेट सुटावी यासाठी त्याच्यावर उपचार केले. त्यानंतर रापीचे सिगारेट पिणे बंद झाले.

summary-toddler-turns-into-chain-smoke