…अन् टोकियो ऑलिम्पिकचे दार उघडले, मराठमोळा गोल्फपटू उदयन मानेचे उद्गार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पीजीटीआय 2020-21 या सत्रात चांगली कामगिरी केल्यामुळे टोकियो ऑलिम्पिकसाठी सहज पात्र ठरू, असे मला वाटत होते. मात्र कोरोनाच्या संकटामुळे हिंदुस्थानात दुसऱयांदा लॉकडाऊन लागल्याने यंदा आपली ऑलिम्पिकवारी हुकणार असे वाटले होते. मार्चमध्ये दिल्ली एनसीआर ओपन स्पर्धेत अखेरच्या होलमध्ये बर्डीसह विजय मिळविण्यात यशस्वी ठरलो. त्या बर्डीमुळेच माझ्यासाठी टोकियो ऑलिम्पिकचे दार उघडले, असे मराठमोळा गोल्फपटू उदयन माने याने सांगितले.

ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या उदयन मानेचा पूना क्लब गोल्फ कोर्स येथे पूना क्लबचे अध्यक्ष नितीन देसाई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पूना क्लब गोल्फ कोर्सचे पॅप्टन ललित चिंचनकर, महिला पॅप्टन पद्मजा शिर्पे, पूना क्लबचे उपाध्यक्ष सुनील हांडा तसेच कार्यकारिणी समितीचे सदस्य गौरव गढोके व इक्रम खान आदी मान्यवर उपस्थित होते. उदयन माने हा पूना क्लब गोल्फ कोर्सचा खेळाडू असल्याने क्लबने टोकियो ऑलिम्पिकला रवाना होण्यापूर्वी आपल्या खेळाडूचा गौरव केला.

पत्रकार परिषदेत बोलताना उदयन माने म्हणाला, मी आता टोकियो ऑलिम्पिकमध्ये अनिर्बन लाहेरीच्या साथीने देशाचे प्रतिनिधित्व करण्यास उत्सुक आहे. तो माझा केवळ चांगला मित्रच नसून माझा रोल मॉडेलही आहे. मी ऑलिंपिकसाठी पात्र ठरल्यामुळे त्यालाही खूप आनंद झाला असून आम्ही पह्नवर एकमेकांच्या संपका&त आहोत. टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरल्याचे वृत्त माझ्यासाठी स्वप्नासारखेच होते. कारण मी जवळपास आशा सोडली होती. दुसऱया लॉकडाऊनमुळे गुणांमध्ये वाढ करण्याची संधी मिळाली नव्हती. मात्र दिल्ली एनसीआर ओपन स्पर्धेतील कामगिरीने मला तारले. मला त्या स्पर्धेतील अंतिम होलची कामगिरी आजही आठवते. अखेरच्या होलमध्ये बर्डी बनवून मी विजय मिळविला होता. त्या बर्डीनेच मी टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलोय, असेही उदयन मानेने सांगितले.

सर्वोत्तम कामगिरी करीन

पूना क्लब गोल्फ कोर्सबद्दल बोलताना उदयन म्हणाला की, येथे सराव करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी स्वतŠला भाग्यवान समजतो. माझा खेळ व तंदुरुस्ती यात सुधारणा करण्यासाठी क्लबची कार्यकारी समिती आणि सर्व सदस्यांनी मला प्रोत्साहन दिले. येथील सुविधांमुळे मला माझ्या खेळात वेगाने सुधारणा करता आली. माझे पहिले प्रशिक्षक विजय दिवे आणि सध्याचे प्रशिक्षक लॉरेन्स ब्रदरीज या दोघांचाही माझ्या कारकिर्दीतील प्रगतीत मोलाचा वाटा आहे. आता टोकियो ऑलिम्पिकमध्ये सर्वोत्तम कामगिरी करण्यात कुठलीच कसर सोडणार नाही, असा निर्धारही उदयन मानेने व्यक्त केला.