सुवर्णस्वप्न भंगले! पदकाची आशा कायम

रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक पटकावणारी हिंदुस्थानची शटलक्वीन पी. व्ही. सिंधू हिला टोकियो ऑलिम्पिकमधील बॅडमिंटन या क्रीडा प्रकारात उपांत्य फेरीत पराभूत व्हावे लागले. तेई झू यिंग हिच्याकडून पी. व्ही. सिंधूला हार सहन करावी लागली. यामुळे तिच्या महिला गटात सुवर्ण पदक जिंकण्याच्या आशांवर पाणी फेरले गेले. पण हिंदुस्थानच्या या खेळाडूला अद्याप कांस्य पदक जिंकण्याची संधी असणार आहे. पी. व्ही. सिंधूसमोर कांस्य पदकाच्या लढतीत बी बिंग जियो हिचे आव्हान असणार आहे.

अकाने यामागुची हिला उपांत्यपूर्व फेरीत पराभूत करणाऱया पी. व्ही. सिंधूला उपांत्य लढतीत सूर गवसला नाही. तेई झू यिंग हिने पहिला गेम 21-18 अशा फरकाने जिंकला. या गेममध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये कडवी झुंज पाहायला मिळाली. पण तेई झू यिंगने दबावाखाली खेळ उंचावला आणि हा गेम आपल्या नावावर केला. दुसऱया गेममध्ये पी. व्ही. सिंधूला झोकात पुनरागमन करता आले नाही. तिचा खेळ आणखीनच घसरला. अखेर 12-21 अशा फरकाने तिला या गेममध्ये पराभूत व्हावे लागले.

आपली प्रतिक्रिया द्या