मुंबई ट्रान्सहार्बर लिंकवर टोल द्यावा लागणार

सामना प्रतिनिधी । मुंबई

शिवडी ते न्हावा शेवादरम्यान उभारण्यात येणार्‍या मुंबई ट्रान्सहार्बर लिंकवरून प्रवास करण्यासाठी मुंबईकरांना टोल भरावा लागणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत दिली. याबाबत विधान परिषद सदस्य हुस्नबानो खलिफे यांनी तारांकित प्रश्न विचारला होता त्याला मुख्यमंत्र्यांनी लेखी उत्तर दिले. या प्रकल्पाचे बांधकाम जपान इंटरनॅशल कॉर्पोरेशन एजन्सी (JICA) या संस्थेकडून प्राप्त होणार्‍या कर्जाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी कंपनीकडून कर्ज घेण्याआधी जपान इंटरनॅशन कॉर्पोरेशन एजन्सीने ऑगस्ट 2016 मध्ये तयार केलेल्या अंतिम अहवालात प्रकल्पासाठी टोल आकारण्याबाबतची शिफारस केली होती.  या प्रकल्पाचे काम 2022 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असून टोलबाबत लवकरच योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.