आयपीएल लिलावाआधी घोंघावले वादळ, इंग्लंडच्या टॉम ब्रँटनने 40 चेंडूंत पाडला 121 धावांचा पाऊस

924

आयपीएल लिलावाच्या आधी प्रत्येक खेळाडू बोली लावणाऱ्या आठ संघांचे स्वतः जवळ लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहेत. आयपीएल लिलावासाठी केवळ चार दिवस शिल्लक राहिले आहेत. त्याआधी एका खेळाडूने वादळी खेळी करून सर्वांचे लक्ष स्वतःकडे खेचले आहे. इंग्लंडच्या टॉम बँटन याने क्वीन्सलॅण्ड प्रीमियर लीग स्पर्धेत खेळताना धावांचा पाऊस पाडला. टॉमने फक्त 40 चेंडूंत 121 धावा केल्या. यात त्याने 13 षटकार आणि 8 चौकार ठोकले. विशेष म्हणजे ही खेळी करण्याच्या एक दिवस आधी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱया मालिकेसाठी टॉमचा इंग्लंडच्या संघात समावेश केला गेला होता.

टॉमची ही खेळी म्हणजे येत्या 17 डिसेंबरपासून होणाऱया बिग बॅश लीग (Big Bash League)ची पूर्व तयारी असल्याचे मानले जात आहे. बिग बॅश लीग स्पर्धेत टॉम ब्रिस्बेन हीट संघाकडून खेळणार आहे. येत्या चार दिवसांतच आयपीएल (IPL) 2020 साठी खेळाडूंचा लिलाव होणार आहे. या लिलावामध्ये काही खेळाडूंना मोठी बोली लागण्याची शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या