जमैकाची टॉनी एन सिंग बनली मिस वर्ल्ड

484

जमैकाची टॉनी एन सिंग हिने मिस वर्ल्ड 2019 चा ताज पटकावला आहे. लंडन येथे शनिवारी रात्री पार पडलेल्या या सोहळ्यात हिंदुस्थानची सुमन राव हिला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. तर फ्रान्सची ओफेली मेझीनो हिने दुसरा क्रमांक पटकावला.

हिंदुस्थानच्या सुमन राव हिने जून महिन्यात झालेली मिस इंडिया ही स्पर्धा जिंकली होती. मूळची राजस्थामधील असलेली सुमन हिने दिड वर्षापूर्वी मिस नवी मुंबई ही स्पर्धा जिंकली होती. तिथूनच तिच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.

आपली प्रतिक्रिया द्या