
हिमाचल प्रदेशात तीन महिन्यांनंतर विकेंडला पर्यटकांची संख्या वाढली आहे. शिमला, नारकंडा, चायल, कसौली आणि धर्मशाळा या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात पर्यटकांची गर्दी दिसत आहे. दुर्गापूजानंतर आता गुजरात आणि अन्य राज्यातून हिमाचलला जाण्यासाठी अॅडवॉन्स बुकिंग सुरू झाली आहे. शिमलाच्या कुफरी आणि नारकंडा येथे पर्यटकांची गर्दी दिसत आहे. यामुळे हॉटेल आणि रिसॉर्टस्ची बुकिंग 80 ते 90 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.