Breaking- भिवपुरीजवळ रुळाला तडा, मुंबईकडे जाणारी लोकल वाहतूक बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
rail-fracture
फाईल फोटो

सामना ऑनलाईन, मुंबई

कर्जत आणि भिवपुरीदरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्याने कर्जतहून मुंबईकडे येणाऱ्या लोकल गाड्यांची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. रोज कोणत्या ना कोणत्या कारणामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत होत असते. बुधवारचा दिवसही त्याला अपवाद ठरला नाही. मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल व्हायला लागले आहेत.