
सामना प्रतिनिधी । लातूर
रेणापूर तालुक्यातील पानगाव येथे अज्ञात चोरट्यांनी घरासमोर उभे असलेले ट्रॅक्टर चोरून नेल्याची घटना घडली. या चोरीप्रकरणी रेणापूर पोलीस ठाण्यात संतोष नवनाथ तुरुप रा. पानगाव यांनी तक्रार दाखल केली. फिर्यादीच्या वडिलांच्या नावावर असणारे आयशर कंपनीचे ट्रॅक्टर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास उपनिरीक्षक तोडकर हे करत आहेत.
























































