बिर्ला महाविद्यालयात दिले वाहतूक नियंत्रणाचे धडे

796

तरुणांना वाहतुकीचे नियम नीट पद्धतीने कळणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी या नियमांचे पालन करणेही आवश्यक आहे. हे नियम समजावून सांगण्यासाठी कल्याणमधल्या बिर्ला महाविद्यालयात वाहतूक पोलिसांनी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतील अभिनेते महेश कोकाटे आणि अभिनेत्री मिनल बाल हे या कार्यक्रमाला उपस्थित होते. प्रत्येकाने वाहतुक नियमांचे पालन करायला हवे असे पोलीस आधिकारी जयंत पाटील आणि विजय शेळके यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले. NSS चे कार्यक्रम आधिकारी डॉ.जायभाये यांनी वेगाला मर्यादा घालणं का आवश्यक आहे हे विद्यार्थ्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. या कार्यक्रमाला बिर्ला महाविद्यालयाच्या उपप्राचार्या स्वप्ना समेळ, कार्यक्रम अधिकारी नागेश पवार आणि सोनाली पाटीलही उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नेतृत्त्व एनएसएस प्रमुख आदेश कासार या विद्यार्थ्याने केले होते तर कार्यक्रमाच्या प्रसिद्धीचे काम शुभम खळदकर आणि अजित खेडकर यांनी सांभाळले होते.

आपली प्रतिक्रिया द्या