Video – रखडलेल्या मधुचंद्राचा लॉकडाऊन… पाहा अंकुश चौधऱीच्या ‘लकडाऊन बी पॉझिटिव्ह’चा ट्रेलर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अंकुश चौधरी आणि प्राजक्ता माळी यांची प्रमुख भूमिका असलेला ‘लकडाऊन बी पॉझिटिव्ह’ हा चित्रपट 25 फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर शिवजयंतीच्या मुहुर्तावर रिलीज करण्यात आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

वासू-सपना या नवविवाहित जोडप्याची व त्यांच्या रखडलेल्या मधुचंद्राची ही कहाणी आहे. वासू व सपनाचे लग्न होते. मात्र देवीला जायचे म्हणून त्यांचा हनीमून रखडतो. त्यानंतर घऱात बरीच पाहुणे मंडळी असल्याने त्या दोघांना एकमेकांपासून लांब रहावे लागते. त्यातच पाहुणे मंडळी निघत असतानाच लॉकडाऊन लागतो. अशा भरलेल्या घरात हनीमूनसाठी तरसत असलेल्या वासूची ही धमाल कॉमेडी या चित्रपटात दाखवली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

चित्रपटाच्या निमित्ताने अंकुश आणि प्राजक्ता ही नवीन जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची निर्मिती शरद सोनवणे, दर्शन फुलपगार,अजित सोनपाटकी आणि सागर फुलपगार यांनी केली असून चित्रपटाचं दिग्दर्शन संतोष मांजरेकर यांनी केलं आहे.  चित्रपटाचं चित्रीकरण पूर्णतः शिवजन्मभूमी जुन्नर (किल्ले शिवनेरी) येथे झाले आहे.