‘एक मराठा… लाख मराठा’ तान्हाजीचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

2602

हिंदुस्थानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांसोबत प्राणांची बाजी लावून स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या नरवीर तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच प्रेक्षकांची उत्कंठा ताणली गेली होती.

कोंढाणा स्वराज्यात परत आणल्याशिवाय चपला घालणार नाही, अशी जिजामातांची प्रतिज्ञा, मुघलांच्या तावडीतून कोंढाणा सोडवण्यासाठी छत्रपती शिवरायांची योजना आणि ती योजना प्राणांची बाजी लावून यशस्वी करणारे नरवीर तान्हाजी मालुसरे यांची कथा या ट्रेलरमधून दिसून येत आहे. चित्रपटाचे संवाद दमदार आहेत. ट्रेलरवरून प्रेक्षकांना अजयचा तान्हाजी आवडल्याचं दिसून येत आहे.

‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ या चित्रपटात अजय देवगण मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर तान्हाजी यांची पत्नी सावित्रीबाई यांच्या भूमिकेत अभिनेत्री काजोल झळकणार आहे. या खेरीज शरद केळकर, पद्मावती राव, सैफ अली खान, अजिंक्य देव, देवदत्त नागे हे कलाकारही यात विविध भूमिकांमध्ये दिसणार आहेत. ओम राऊत दिग्दर्शित तान्हाजी हा चित्रपट 10 जानेवारी 2020 रोजी प्रदर्शित होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या