
उड्डाण केल्यानंतर काही वेळातच तांत्रिक बिघाड झाल्याने एका प्रशिक्षण विमानाचे शेतात आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. उत्तर प्रदेशातील अलीगढ जिल्ह्यात चंदाउदा गावाजवळ प्रशिक्षण विमान उतरवण्यात आले. घटनेच्या वेळी विमानात एक प्रशिक्षणार्थी वैमानिक आणि एक प्रशिक्षक उपस्थित होते. करावे लागले. विमान आणि त्यातील हे दोन्ही व्यक्ती सुरक्षित आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
इंडिया टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, खासगी विमानन कंपनीद्वारे चालवले जाणारे VT-PFB या विमानाने सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास प्रशिक्षण फेरीसाठी धनिपूर विमानतळावरून उड्डाण केले. उड्डाण केल्यानंतर लगेचच विमानात तांत्रिक बिघाड असल्याचे वैमानिकाच्या लक्षात आले. त्यानंतर वैमानिकाने हरदुआगंज परिसरातील चंगेरी गावाजवळ विमानाचे सुरक्षितपणे आपत्कालीन लँडिंग केले.


























































