
सामना प्रतिनिधी, मुंबई
राज्याच्या पोलीस खात्यात मोठे फेरबदल करण्यात येत आहेत. शुक्रवारी ९२ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यानंतर पुन्हा तब्बल १२० अधिकाऱयांच्या बदल्या करण्यात आल्याचे समजते. हायप्रोफाईल मानल्या जाणाऱ्या ठाण्याच्या पोलीस आयुक्तांची बदली करण्यात आली असून विवेक फणसाळकर ठाण्याचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी संजय कुमार यांची वर्णी लागली आहे.
परमबीर सिंग आता राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक कायदा व सुव्यवस्था म्हणून जबाबदारी सांभाळतील. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नागराळे यांचीदेखील बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी राज्य सीआयडीचे प्रमुख संजय कुमार यांची वर्णी लागली आहे. नागपूरचे पोलीस आयुक्त के. व्यंकटेशन यांना पुण्याचा कार्यभार देण्यात आला आहे, तर अतिरिक्त पोलीस महासंचालक भूषण कुमार हे नागपूरचे नवे पोलीस आयुक्त असतील.




























































