मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी प्रवास करायलाच हवा, वाचा सविस्तर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रवास आपल्याला उत्साहाने जीवन जगायला शिकवतो. प्रवास मानसिक आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरतो. आपल्याला दैनंदिन जीवनापेक्षा वेगळे विचार करण्याची संधी प्रवासामुळेच मिळते. प्रवासामुळे व्यक्तिमत्त्व विकासाची आणि स्वतःमध्ये आत्मपरीक्षण करण्याची संधी मिळते. असं म्हणतात की, घरातून बाहेर पडल्यावर आपली नेहमीची विचारांची गती मंदावते. त्यामुळेच प्रवास आपल्याला स्वच्छंद जगायला शिकवतो.

प्रवास करण्याचे आरोग्य फायदे

 

प्रवासामुळे आपल्या डोक्यात विचारांची स्पष्टता निर्माण होते. मुख्य म्हणजे आपल्याला सकारात्मक निर्णय घेण्यासाठी प्रवास करण्यामुळे बळ मिळते. 
नवीन ठिकाणे पालथी घातल्याने, आपल्यात आत्मविश्वास वाढतो. तसेच डोक्यामध्ये नवीन कल्पना येतात आणि सर्जनशीलता वाढते.
प्रवासात अनेक नवीन ओळखी आणि बंध जुळतात. यामुळे आपले सामाजिक संबंध सुधारतात. नवीन लोकांशी भेटण्याचा आणि बोलण्याचा आत्मविश्वास वाढु लागतो. प्रवासात नवीन लोकांशी संवाद साधल्याने एकटेपणाची भावना कमी होते. 
प्रवास केल्यामुळे आपल्या शरीरातील डोपामाइन नावाचे हार्मोन वाढते. यामुळे आपल्यातील नैराश्याचे प्रमाण हे एकदम कमी होण्यास मदत होते. प्रवासामुळे मानसिक आरोग्यावर खूप चांगला फरक पडतो.

प्रवासाचे खूप मानसिक फायदे आहेत. प्रवासामुळे ताण आणि चिंता कमी होऊ शकते. सहलीचे नियोजन करणे आणि अनुभव घेणे हे एक अनोखे सुख आहे. एकदा सहलीला गेल्यावर आपल्याला अनेक समस्यांचा विसर पडण्यासाठी मदत होते.

 

प्रवास केल्याने आत्मविश्वास वाढतो, स्वतःबद्दल आपण एका वेगळ्या वाटेने विचार करु लागतो. नवीन ठिकाणी भेट देण्याने आणि नवीन गोष्टी अनुभवल्याने मिळणारे स्वातंत्र्य समाधानाची भावना निर्माण करते. हे लोकांना त्यांच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडण्याची आणि नवीन गोष्टी अनुभवण्याची संधी देते. प्रवासाला गेल्यावर आपल्या, व्यक्तिमत्व विकासात देखील मदत होते.

 

प्रवास हा शारीरिक आरोग्य सुधारण्याचा एक उत्तम मार्ग असू शकतो. प्रवासादरम्यान होणारी शारीरिक हालचाल आणि नैसर्गिक वातावरणाचा संपर्क यांचा शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. योग्य नियोजन आणि स्वतःची काळजी घेतल्यास, प्रवासाचा मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो.