अरे वा..! व्हिसाशिवाय बिनधास्त फिरा या 16 देशात, केंद्र सरकारने दिली ‘फिरस्ती’ लोकांना खुशखबर

विदेशात जायचं म्हंटले की व्हिसा आवश्यकच. व्हिसा मिळेपर्यंत अनेकांचे प्लॅनही रद्द होतात. मात्र काही असे देश आहेत जिथे जायला हिंदुस्थानच्या नागरिकांना व्हिसाची आवश्यकता नाही. केंद्र सरकारने राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना फिरायची आवड असणाऱ्या लोकांना ही खुशखबर दिली आहे.

परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी 16 देशात हिंदुस्थानी पासपोर्टवर व्हिसाशिवाय फिरता येईल अशी माहिती दिली. तसेच 43 असेही देश आहेत जे हिंदुस्थानी नागरिकांना ऑन-अरायव्हल व्हिसाची सुविधा देते. तर 36 असे देश आहेत जे हिंदुस्थानी पासपोर्ट असणाऱ्यांना इ-व्हिसाची सुविधा देतात, अशीही माहिती त्यांनी दिली. सध्या कोरोनाचे वातावरण असल्याने बाहेर फिरायचे टाळत असला तरी कधी मनसोक्त फिरावे वाटले तर खालील 16 देशात व्हिसाशिवाय प्रवेश मिळावा आणि भटकंती करा.

1. मालदीव
2. मॉरिशस (90 दिवसांसाठी फ्री एन्ट्री)
3. भूतान
4. बारबाडोस
5. हॉन्ग कॉन्ग एसएआर
6. डोमिनिका
7. सर्बिया
8. ग्रेनाडा
9. हैती
10. मोंटेसेराट
11. नेपाळ
12. निउए आयलँड
13. सेंट विसेंट (एक महिना व्हिसाशिवाय राहू शकता)
14. समोआ
15. सेनेगल (व्हिसाशिवाय 90 दिवस राहू शकता)
16. त्रिनिदाद ऐंड टोबैगो (व्हिसाशिवाय 90 दिवस राहू शकता)

आपली प्रतिक्रिया द्या