
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधात देशद्रोहाची तक्रार दाखल करण्यात आली आहे. बिहारमधील सीतामढी या न्यायालयात सामाजिक कार्यकर्ता ठाकूर चंदनसिंह यांनी तक्रार दाखल केली आहे. केरळ येथील कन्नूर येथे झालेल्या सभेत अमित शहांनी न्यायालयाविरोधात भाष्य केले होते. लोकांच्या धार्मिक आस्थेविरोधात आणि जे लागू करता येत नाहीत असे निर्णय न्यायालयाने घेऊ नये, असे म्हटले होते. याप्रकरणी ठाकूर चंदनसिंह यांनी तक्रार दाखल केली असून येत्या 6 नोव्हेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीत राजकीय फायदा घेण्यासाठी शहा यांनी हे वक्तव्य केल्याचा आरोप ठाकूर यांनी केला आहे.





















































