ट्रान्सफार्मरवर झाड कोसळले, राहुरी पंचक्रोशीत पाणी पुरवठा खंडीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । राहुरी

विजेचा पुरवठा करणा-या ट्रान्सफार्मरवर झाड कोसळून पडल्याने राहुरीच्या मुळा धरणावरील राहुरी, बारागाव नांदुर, देवळाली प्रवरा योजनांसह मुळा पाटबंधारे विभागाचा पाणी पुरवठा बुधवारी खंडीत झाला आहे. बुधवारी पाण्याची निर्जळी झाल्याने लाभधारक गावातील नागरीकांवर पाण्याच्या शोधार्थ भटकंतीची वेळ आली.

मंगळवारी रात्री मुळा धरणाच्या मच्छबीज केंद्राजवळ ही घटना घडली.झाड कोसळल्याने विद्यृत वाहिण्यांची तुटफूटी मुळे विद्यृत पुरवठा खंडीत होऊन राहुरी नगर परिषद,देवळाली प्रवरा नगर परिषद,बारागाव नांदुर व १४ गावे,मुळानगर येथे पाण्याची निर्जळी झाली.धरणावरील ट्रान्सफार्मर दुरूस्तीसाठी राहुरी नगर परिषद तसेच महावितरणचे कर्मचा-यांनी बुधवारी बुधवारी सकाळ पासुन कामाला सुरुवात केली आहे.

बुधवारी राञी दुरूस्ती काम पुर्ण होऊन गुरूवारी शहराचा पाणी पुरवठा करणे शक्य होईल अशी माहिती नगर परिषदेचे पाणी पुरवठा विभाग प्रमुख काकासाहेब अढागळे यांनी दिली.ट्रान्सफार्मर लगत असलेले झाड कमकुवत झाल्याने केव्हाही कोसळु शकते ही माहिती असताना माञ महावितरणचे अधिकारी व कर्मचारी बेफिकीर राहिल्याने ही घटना घडली आहे.

इतर वेळात देखील धरणावरील ११ के.व्ही.
ट्रान्सफार्मर मध्ये होणारा तांञिक बिघाड तसेच राहुरी नगर परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाच्या दुर्लक्षाने राहुरी शहरातील पाणी पुरवठा खंडीत होण्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत.

मुळा धरणावरून थेट पाईपलाईन द्वारे राहुरी शहराला पाणी पुरवठा केला जात आहे.१४ किलोमिटर अंतरावरील पाईपलाईनने आलेले पाणी साठवणुकीस राहुरी शहरात ३ तर जोगेश्वरी आखाडा येथे १ जलकुंभाची व्यवस्था करण्यात आली आहे.माञ ट्रान्सफार्मरवर झाड कोसळून पडल्याच्या घटनेने या चारही जलकुंभात बुधवारी पाण्याचा खडखडाट झाला.
बुधवारी बुधवारी सकाळी मुळा धरणाच्या पाणीसाठ्याची १९ हजार २५० दशलक्ष घनफुट नोंद होती. माञ पाण्याच्या निर्जळीने धरण उशाला व कोरड घशाला ही दुदैवी अवस्था राहुरीकरांची झाली.