ठाणे – पार्क केलेल्या गाड्यांवर झाड कोसळलं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । ठाणे

मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईत पावसाने धुमाकूळ घातला आहे. संततधार पावसामुळे झाडं पडण्याचे प्रकार होत असून चेंबुरनंतर आता ठाण्यातही वाहनांवर झाड कोसळलं आहे.

ठाण्यातील रहेजा गार्डन परिसरात पार्क केलेल्या गाड्यांवर झाड कोसळलं आहे. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी झाडाला हटवण्याचे कार्य सुरू केले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.