
मुंबईत झाडांवर करण्यात येणारी बॅनरबाजी आता चांगलीच महागात पडणार आहे. झाडांवर बॅनर लावण्यासाठी खिळे, तारांचा वापर केल्याने झाडे मृत पावत असल्याने बॅनर लावणाऱयांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. यासाठी सर्व 24 वॉर्डमधील विभाग कार्यालयातील वरिष्ठ निरीक्षकांना उद्यान अधीक्षक आणि कृक्ष अधिकाऱयांना माहिती देणाचे निर्देश देण्यात आले आहेत.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत विविध धार्मिक सण, सांस्कृतिक कार्यक्रमांसह मोठय़ा प्रमाणात राजकीय बॅनरबाजी सुरू असते. यामुळे शहराचे किद्रुपीकरण तर होतेच शिवाय झाडांवर खिळे ठोकून, तारा गुंडाळून बॅनर लावले जात असल्याने झाडांना गंभीर इजा पोहोचते. खिळे, तारा वर्षानुवर्षे काढल्या जात नसल्याने झाडे मृत पावतात. त्यामुळे झाडांवर बॅनर लावण्यास बंदी घालावी, अशी मागणी ठराकाच्या सूचनेद्वारे शिवसेना नगरसेवक अमेय घोले यांनी केली होती. यावर पालिकेने अभिप्राय देताना झाडांवर बॅनर लावणाऱयांवर कारवाई करासाठी कार्यवाही सुरू केल्याची माहिती दिली आहे. झाडांवर लावण्यात येणाऱया बॅनर्स, पोस्टर्सची माहिती तत्काळ उपलब्ध करून देण्यासाठी पालिकेच्या प्रभाग कार्यालयातील अनुज्ञापन विभागामार्फत उद्यान अधीक्षक आणि कृक्ष अधिकाऱयांना पत्र पाठविण्यात आले असल्याचेही प्रशासनाने यात नमूद केले आहे.
155 बेकायदा होर्डिंग्जवर खटले दाखल
z उच्च न्यायालयाने 2010 मध्ये विना परवाना बॅनर्स, पोस्टर्स लावणाऱयांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्र विद्रुपीकरण प्रतिबंधक कायदा 1995 नुसार हे गुन्हे दाखल केले जातात.
z एप्रिल 2020 ते मार्च 2021 या वर्षाच्या काळात सार्वजनिक ठिकाणचे 7 हजार 533 बॅनरर्स पोस्टर महानगरपालिकेने हटकले आहेत. त्यातील 155 जणांवर महानगरपालिकेने खटले दाखल केले आहेत.
z 598 तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्या आहेत.त्यातील 31 प्रकरणांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
























































