मित्र भाडय़ाने मिळेल!

दुःख आडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वणव्यासारखे गारव्यासारखा… हे गाणं ऐकलं की मित्र-मैत्रिणींच्या आठवणी दाटून येतात, पण प्रत्यक्षात आपले मित्र असतात किती? खरंच आपण मैत्री जपतो का? नवे मित्र बनवतो का? क्वचितच. वय झालं की आपण स्वतःमध्ये किंवा स्वतःच्या संसारात रमतो. फक्त काही गरज लागली की मित्राची आठवण येते. अशा एकलकोंडय़ांची गरज भागवण्यासाठी मित्र भाडय़ाने देण्याचा ट्रेंड सध्या सोशल मीडियात आला आहे. वेगवेगळय़ा कारणासाठी हे मित्र भाडय़ाने मिळतात. तुमच्यावर जोकवर हसण्यासाठी, तुमच्यासोबत फिरण्यासाठी, सेलिब्रेशनसाठी, गप्पा मारण्यासाठी मित्र भाडय़ाने दिले जातात. हा विचित्र ट्रेंड लवकर जावा आणि नवे मित्र जोडण्याची व जपण्याची सुबुद्धी सर्वांना मिळावी, अशीच अपेक्षा कोणीही करेल.