
मुंबईच्या मरीन ड्राइव्हवरील एका अनोख्या लावणी सादरीकरणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तरुणी ‘मला पिरतीच्या झुल्यात झुलवा’ या लोकप्रिय गाण्यावर अप्रतिम लावणी सादर करताना दिसत आहेत. तिच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून कोणीही थक्क होईल. मरीन ड्राइव्हवर फिरायला आलेली लोकही काwतुकाने त्यांना पाहत होती. या अप्रतिम सादरीकरणामुळे नेटकऱ्यांनी त्यांची भरभरून प्रशंसा केली आहे. महाराष्ट्राच्या पारंपरिक नृत्यशैलीला मिळत असलेला हा नवा रंग पाहून अनेक जण आनंद व्यक्त करत आहेत. priya_dnyaneshwar_naskar या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून नेटकरीही यावर वेगवेगळय़ा प्रतिक्रिया देत आहेत.



























































