
पूर्वीच्या काळी लोकांना खरी जन्मतारीख ही माहितीच नसायची. शाळेत टाकण्यासाठी 1 जून किंवा 7 जून ही जन्मतारीख दिली जायची. अशाच एका आजीची खरी जन्मतारीख कुणाला माहिती नव्हती, पण त्यांच्या कुटुंबाने आजीची खरी जन्मतारीख शोधून काढून हा दिवस अगदी खास पद्धतीत साजरा केला आहे. त्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. आजीची जन्मतारीख समजताच 86 वा वाढदिवस साजरा करण्याची तयारी सुरू झाली. घर अगदी फुग्यांनी सजवले. त्यानंतर केक कापण्यासाठी आजीला सोफ्यावर बसवले. सगळ्यांनी हॅप्पी बर्थडे गाणे गाण्यास सुरुवात केली आणि आजीसुद्धा निरागसपणे टाळ्या वाजवायला लागली. मग घरच्या मंडळींनी तिला ‘अगं तू केक काप’ असे सांगितले. त्यानंतर केक भरवून सगळ्यांनी आजीचे तोंड गोड केले आणि अशा प्रकारे आजीचा वाढदिवस साजरा करण्यात आला.