
भाजप आमदार मुक्ता टिळक यांना आज विधानसभेत श्रद्धांजली वाहण्यात आली. श्रद्धांजली वाहून दिवसभराचे कामकाज तहकूब करण्यात आले. मुक्ता टिळक यांना विधानसभेत शोकप्रस्तावाद्वारे श्रद्धांजली वाहण्यात आली. मुक्ता टिळक यांच्यासारख्या निष्ठावान आणि कर्तृत्ववान लोकप्रतिनिधीचे निधन ही केवळ भाजपची नाही तर समाजाची हानी असल्याच्या भावना विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केल्या.



























































