
कठोर कायद्यामुळे तिहेरी तलाकची संख्या कमी झाल्याचा दावा राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाने केला आहे. याबाबत माहिती देताना आयोगाच्या सयेद शेहजादी यांनी भोपाळ येथे सांगितले कि, मी अनेक मुस्लिम महिलांशी संवाद साधला त्यांनी सांगितले कठोर कायद्यामुळे तलाकची प्रकरणे बरीच कमी झाली आहेत. दोन वर्षांपूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्रिपल तलाक विरोधी कायद्याला संमती दिली होती. या कायद्यानुसार पतीला तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो.




























































