त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दिपोत्सवाने उजळले खाकीदास बाबा मठ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

शहरातील लालटाकी परिसरातील खाकीदास बाबा मठामध्ये त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या दिपोत्सवाने मंदिर परिसर उजळून निघाले. टिमटिमणार्‍या हजारो दिव्यांचा नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. खाकीदास बाबा (माहेश्‍वरी) मठ ट्रस्ट व सावेडी माहेश्‍वरी समाजाच्या वतीने या दिपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

प्रारंभी ज्येष्ठ पत्रकार अ‍ॅड.बाळ ज. बोठे, सविता बोठे व स्वरुप सोनी, स्नेहा सोनी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन आरतीने या दीपोत्सवाचे प्रारंभ झाले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष दीपक काबरा, डॉ .विजयकुमार जाजू, योगेश सोमाणी, जगदिश दरक, लक्ष्मीकांत झंवर, छाया काबरा, अमोल सोनी आदिंसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या दीपोत्सवात अबालवृध्दांसह महिला, युवक-युवती सहभागी झाले होते.